कोसळणारा पाऊस, हुडहुडणारी थंडी,आणि निर्मनुष्य रस्ते माणसाच्या जगण्यावर अवलंबून असणारी जनावरे माणूसच अश्या परिस्थितीत घाइतुकीला आल्याने वाऱ्यावर सोडली गेली आहेत.प्रतिकूल परिस्थितीत कोसळणाऱ्या पावसात या मोकाट जनावरांनी स्मार्ट सिटीच्या बस थांब्याचाच आसरा घेतला.
त्यांच्या भावुक डोळ्यात माणसाला झालंय तरी काय हाच प्रश्न दिसत आहे कारण नेहमी नेहमी बस स्थानकात शहरात गर्दी करणारी माणसे कोरोनाच्या भीतीने आणि पावसाने परागंदा झाली आहेत.
माणसांनी आपल्या सोयीसाठी अनेक प्राण्यांना आपल्यावर अवलंबित केले आहे त्यांचा मनाजोगता वापर करून घेतला पण ज्यावेळी आपल्याच पाय खालची वाळू सरकली त्यावेळी या मूक प्राण्यांकडे बघायला हि त्याला वेळ नाही.भूत दयेचा आव आणणारे कुठेच दिसत नाही अश्या जनावरांना सध्या माणसाच्या उबेची गरज असताना माणूसच माणुसकी हरवत गेला आहे. महा पालिकेने तरी या अगतिक असहायय जनावरांना आसरा देऊन त्यांच्या पोटा पाण्याची आणि निवाऱ्याची व्यवस्था केली पाहिजे.
शहर स्मार्ट होत आहेत अन त्या बरोबर माणसाची वृत्ती स्मार्ट झाली पाहिजे जनमाणसा बरोबर प्राण्याचेही श्रेष्ठच आहे ते माणसाने समजून घेतलं पाहिजे माणसाच्या ममत्वाचा झरा ओला राहिला तर माणसाच्या माणूस पणाला अर्थ आहे .स्मार्ट सिटीत आत्मा हरवलेली माणसे फिरत राहतील तर गाव देखणी होतील पण त्यांच्यात मायेची ऊब राहणार नाही