सध्या पावसाचा जोर वाढला असून बेळगाव जिल्ह्यात आज बुधवार दि. 5 ऑगस्टपर्यंत 1699.7 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. आज जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस खानापूर येथे 180 मि. मी. इतका नोंदविला गेला असून त्याखालोखाल बेळगाव शहर परिसरात सर्वाधिक 73.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातील 5 तारखेपर्यंत 121.41 सरासरीने एकूण 1699.7 मिलिमीटर पाऊस पडला आहे.
यापैकी दि. 1 ऑगस्ट रोजी 47.8 मि. मी., दि. 2 ऑगस्ट रोजी 24.9, दि. 3 ऑगस्ट रोजी 51.0, दि.4 ऑगस्ट रोजी 213.0 आणि दि. 5 ऑगस्ट रोजी 653.0 मि. मी. इतका पाऊस जिल्हाभरातील पर्जन्यमापन केंद्रामध्ये नोंद झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या पांच दिवसात जिल्ह्यातील विविध पर्जन्यमापन केंद्रांमध्ये नोंदविला गेलेला एकूण पाऊस पुढील प्रमाणे आहे.
अथणी एचबीसी 53 मि. मी., बैलहोंगल आयबी 83, बेळगाव आयबी 273, चिकोडी 97, गोकाक 52, हुक्केरी एसएफ 89, कागवाड -शेडबाळ 66.1, खानापूर 412, कित्तूर 185, मुडलगी 57.3 निपाणी आयबी 154.3, रायबाग 54, रामदुर्ग 64 आणि सौंदत्ती 60 मि. मी.
आज बुधवारी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस खानापूर येथे 180 मि. मी. इतका नोंदविला गेला असूनखालोखाल बेळगाव शहर परिसरात सर्वाधिक 73.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच काल मंगळवारी बेळगाव शहर परिसरात 50.04 मि. मी. आणि खानापूर येथे 73.02 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती.