कर्नाटकात गोहत्या बंदी कायदा लागू करण्यात येणार असून पुढील अधिवेशनात या संदर्भातील विधेयक सादर करण्यात येईल, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री प्रभू चौहान यांनी दिली. विधानसौधमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
आमचे सरकार गोमातेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. यापूर्वी २०१२ मध्येच हा कायदा अंमलात येणे गरजेचे होते. परंतु त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीत त्यांनी अडथळा आणल्याची तक्रार केली आहे.
गोहत्या बंदी लागू करण्याचा आपला उद्देश असून काँग्रेसने त्याला विरोध केला आहे. परंतु, आता आम्ही आमच्या निर्णयापासून मागे हटणार नसल्याचे ते म्हणाले. आता केंद्रात व राज्यात आमच्या पक्षाचेच सरकार आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करण्यात आता कोणतीही अडचण येणार नाही. पुढील सत्रात विधेयक सादर करून ते मंजूर केले जाईल, असेही मंत्री चौहान यांनी स्पष्ट केले.