हिंडलगा येथील तरुण भारत प्रेसनजीकच्या विजयनगर – हिंडलगा रस्त्याशेजारी सध्या मोठ्या प्रमाणात केरकचरा टाकण्यात येत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून या कचऱ्याची तात्काळ उचल करण्याची मागणी केली जात आहे.
हिंडलगा येथील तरुण भारत प्रेसनजीक विजयनगर – हिंडलगा रस्त्याशेजारी सध्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होत आहे.
रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांनाकडून विशेषतः मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. येथील कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.
परिणामी कचरा टाकलेल्या ठिकाणी रस्त्यावरून जाताना नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. तरी हिंडलगा ग्रामपंचायतीसह संबंधित खात्याच्या अधिकार्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन या कचऱ्याची उचल करण्याबरोबरच आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.