मंगळवारी 20 रुग्ण सापडल्या नंतर बेळगावात बुधवारी नवीन 27 रुग्ण आढळले आहेत.त्यामूळे गेल्या दोन दिवसात बेळगावात 47 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
बेळगावात एकूण ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा शंभरी पार होत 120 हुन अधिक झाला आहे तर एकूण रुग्ण संख्या स्थानिक बुलेटिन नुसार 435 झाली आहे.
बुधवारी आढळलेले रुग्ण हनुमान नगर 3, भारत नगर 2 काकती हिंडलगा उज्वल नगर ,वंटमुरी कॉलनी प्रत्येकी एक तर अथणी तालुक्यातील 10, गोकाक तालुक्यातील 5 रुग्ण चिकोडी 1 तर रामदुर्ग तालुक्यातील 2 असे एकूण 27 आहेत.
एकूण 435 पैकी 342 रुग्ण बरे झाले आहेत.आता पर्यंत 29455 रुग्णांचे निरीक्षण झाले आहे.