वडगाव येथील ग्रामदेवता मंगाई देवीची जत्रा दरवर्षीप्रमाणे दि 14 ते 18 जुलै कालावधीत पाच दिवस आहे.पण सध्या बेळगाव शहर आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
बेळगाव शहरात 138 हुन अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.35 हून अधिक कंटेन्मेंट झोन झाले आहेत.
मंगाई देवी जत्रेसाठी केवळ बेळगाव नव्हे तर महाराष्ट्र,गोव्यातून मोठ्या संख्येने भक्त येतात.पण सध्याची परिस्थिती पाहता सोशल डिस्टनसिंग वगैरे नियम पाळणे जत्रेच्या कालावधीत शक्य होणार नाही.
त्यातच पावसाचा जोर देखील वाढला आहे.मंदिर परिसरात सानिटायजेशन करणेही शक्य नाही.त्यामुळे यावर्षी दरवर्षी प्रमाणे जत्रा होणार नाही याची सर्वजनिकांनी नोंद घ्यावी असे पोलीस खात्याने कळवले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे पोलीस खात्याने कळवले आहे.कोरोनामुळे पहिल्यांदाच वडगावची ग्राम देवता असलेली मंगाई यात्रा रद्द झाली आहे बेळगाव शहरात दरवर्षी भरणारी मोठी यात्रा असते.
केवळ पंच मंडळीच्या उपस्थितीत मंगळवारी देवीला घातलेले मोजके जण गाऱ्हाणे उतरवणार आहेत त्यांनतर मन्दिर परीसरात पोलीस बंदोबस्त असणार आहे अशीही माहिती उपलब्ध झाली आहे.