झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येमुळे जिल्हा रुग्णालयावर प्रचंड ताण पडत असल्यामुळे खाजगी रुग्णालयांनी कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याला प्रतिसाद देताना तीन खाजगी हॉस्पिटल्स कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यास तयार झाली असून एका हॉस्पिटलने आपले काम सुरू देखील केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वेणूग्राम हॉस्पिटलमध्ये काल बुधवारपासूनच रुग्णांचे स्वॅबचे नमुने घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या नमुन्यांची तपासणी सरकारमान्य प्रयोगशाळेत केली जाणार आहे.
त्याप्रमाणे आज गुरुवारपासून लेक व्ह्यू हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांवरील उपचार सुरू होणार आहेत. याठिकाणी रुग्णांची चांचणी निशुल्क केली जाणार असली तरी पीपीई किटचा खर्च मात्र रुग्णांना पेलावा लागणार आहे. त्याचप्रमाणे उपचारासाठीचे शुल्क आरोग्य खात्याने निश्चित केलेल्या दराप्रमाणे आकारले जाणार आहे.
या अगोदर बिम्स व्यतिरिक्त के एल ई आणि हालभावी कुमार स्वामी ले आऊट मधील हॉस्टेल मध्य उपचार सुरू आहेत.तर मिलिटरी हॉस्पिटल कॅटोंमेंट इस्पितळ इ इस आय इस्पितळ येथेही बेड तयार आहेत