गेल्या पंधरा दिवसात बेळगाव शहर तालुका आणि जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा पाहता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य खाते सतर्क झाले आहे. कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना बीम्सच्या ओव्हर फ्लो झाले आहे अश्या परिस्थितीत रुग्णाच्या सेवेसाठी प्रशासनाने तातडीने तीन हॉटेल्स ताब्यात घेतली आहेत आणि ती हॉटेल कोरोना उपचार केंद्रात रूपांतरित होणार आहेत
ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत अशा रुग्णावर हालभावी येथील मोरारजी देसाई हॉस्टेल मध्ये उपचार सुरु आहेत या ठिकाणी तात्पुरते कोविड उपचार केंद्र उभारले असून ८० बेड ठेवण्यात आले आहेत. गेल्या १ जुलै पासून आका निरंतर वाढतच आहे १६ जुलै रोजी पर्यंत ३०० ऍक्टिव्ह रुग्ण झाले आहेत आणखी एका महिन्यात ते वाढणार आहेत त्यामुळे बेळगाव आरोग्य खाते व जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे व त्यांनी शहरातील ३ लॉजिंग वर कोविड रुग्णावर उपचार करण्याचे ठरवले आहे .
बेळगाव शहरातील हॉटेल सन्मान हॉटेल रोहन रेसिडेन्सी आणि हॉटेल रेक्स अनेकस या लॉजिंग ,मध्येही कोरोना पॉजिटीव्ह वर उपचार होणार आहेत. प्रथम संपर्कात आलेल्या रुग्णांवर इथे उपचार होणार असून या तिन्ही लॉजिंग ,मध्ये कोरोना बधितांसाठी चोवीस तास वैधकीय आणि इतर सेवा उपलब्ध राहणार आहे .
प्रशासन विविध पातळ्यांवर कुरणा आटोक्यात आणण्यासाठी कोरोनावरील उपचारासाठी झटत असताना ही साथ मात्र आटोक्यात येताना दिसत नाही. यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाय योजना अवलंबत आहे.