जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ यांनी शनिवारी पत्रकात परिषदेत कोरोना बधितांना बेड कमी पडणार नाहीत बिम्स वगळता 768 बेड तयार आहेत अशी माहिती दिली होती त्यानंतर रविवारी त्यांनी कोविड साठी बेड वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
रविवारी सकाळी त्यांनी ई एस आय इस्पितळ कॅटोंमेंट भागातील मिलीटरी हॉस्पिटल आणि कॅटोंमेंट हॉस्पिटलला भेट देऊन पहाणी केली.दोन्ही इस्पिटळाच्या अधिकारी आणि डॉक्टरांशी कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी सरकारच्या मार्गसुची अनुसार आवश्यक सुविधा करून घेण्याच्या सूचना दिल्या.
कोविड फायटर डॉक्टरांसाठी नवीन कोविड केअर सेंटर
बेळगाव जिल्ह्यात गेल्या चार महिन्यापासून सेवा बजावणाऱ्या डॉक्टर नर्स यांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांच्यावर सामान्य ऐवजी वेगळ्या इस्पितळात उपचार केले जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहे.
नर्स आणि डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांच्यावर कॅटोंमेंट इस्पितळात उपचार केले जाणार आहेत यासाठी 40 बेड सज्ज आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी दिली.
इ एस आय इस्पितळात 25 बेड आणि मिलिटरी इस्पितळात 50 बेडची व्यवस्था करण्यात आली असून या दोन्ही ठिकाणी सामान्य कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
हिरेमठ यांनी मिलिटरी इस्पितळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत मिलिटरी इस्पितळात कोरोना पोजिटिव्ह वर उपचार होतील असे स्पष्ट केले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ, मनपा आयुक्त जगदीश के एच, आरोग्य खात्याचे डॉ तुक्कार आदी उपस्थित होते.