कडोली येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी आपला डाव साधल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिरात साडे पाच वाजता भाविक दर्शनासाठी गेले असताना कुलूप तोडल्याचे प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर मंदिरातील दोरीने बांधण्यात आलेली दानपेटी चोरट्यांनी पळविली आहे.
तीन ते चार वर्षांपूर्वी हे मंदिर नव्याने बांधण्यात आले आहे. भाविकांच्या आग्रहास्तव येथे या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मात्र चोरट्यांनी दानपेटी चोरून नेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने आता मंदीर ही सुरक्षित राहिले नसल्याचे दिसून येत आहे.
चोरट्यांनी आता मंदिरांना लक्ष बनविण्यास सुरुवात केली आहे. या आधीही ही कडोली परिसरात मंदिरे फोडण्याचे प्रकार उघडकीस आले होते. आता पुन्हा कडोली येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात चोरी झाली आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली होती.
मंगळवारी पहाटे घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलीस स्थानकात नोंद झाली नसली तरी ट्रस्ट कमिटी नोंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे आता मंदीरही सुरक्षित राहिली नाहीत असेच दिसून येत आहे.