जिल्हा रुग्णालयासमोर मागील आठवड्यात झालेल्या हिंसाचारातील १४ आरोपीना अटक करण्यात आले होते. यातील ११ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे.
मागील आठवड्यात रुग्णाच्या झालेल्या मृत्यूनंतर बीम्स प्रशासनाला जबाबदार ठरवत संतप्त जमावाने बीम्स समोर हैदोस घातला. यादरम्यान रुग्णवाहिका पेटवून देण्यात आली होती.
तसेच पोलीस वाहने आणि इतर वाहनांचीही तोडफोड करण्यात आली होती आणि डॉक्टरांवरही हल्ला करण्यात आला होता.
याची दाखल घेत प्राथमिक टप्प्यात १४ जणांना अटक करण्यात आली होती. यातील ११ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.