फुलबाग गल्ली येथे एका व्यापाऱ्याने टाटा एस च्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मुदसर मोहम्मदहुसेन पन्हाळी वय 38 राहणार न्यू गांधीनगर असे त्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी तीन मुले असा परिवार आहे. मार्केट पोलीस स्थानकाचे निरीक्षक व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.
मुदसर हा मार्केटमध्ये कांदा फळ तसेच भाजी विक्री करीत होता. त्याला दारूचे व्यसन जडले होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडला होता. याच तणावाखाली येऊन त्याने फुलबाग गल्ली जवळ उभ्या असलेल्या एका टाटा एसच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली याची माहिती मार्केट पोलीस स्थानकाला देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह हॉस्पिटलमधील शवागारात दाखल करण्यात आला व शवविच्छेदन करून हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून टाटा एस त्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे याबाबत तर्कवितर्क व चर्चा जोरदार सुरू आहेत.