लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरपले. मात्र न भरकटता आपली बहीण आणि आपण या समाजात काहीतरी करावे या दृष्टिकोनातून काका काकीच्या मार्गदर्शनाखाली त्याने अभ्यासाला सुरुवात केली. दहावीत 94% घेऊन तर बारावीत 95 टक्के घेऊन उत्तीर्ण झाला. आणि काकांच्या परिश्रमाला श्रेय देण्याचे काम त्याने केले. त्याचे ध्येय मोठे आहे तो सीए किंवा सी एस होण्याचे स्वप्न पाहत आहे. त्यासाठी त्याचे परिश्रम अधिक जिद्दीने घेण्यास तो आता सज्ज झाला आहे.
ग्रामीण भागातील सांबरा गावचे सुपुत्र संदीप संजय गिरीमल आहे. संदीप हा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. त्याची बहिणीही हुशार होती. नुकतीच बहिणीचे लग्न लावून देण्यात आले आहे. लहानपणीच त्याचे आई-वडील वारल्याने त्याचे संगोपन त्यांच्या काका-काकी म्हणजेच नागेश मारुती गिरमल व वनिता नागेश गिरमल यांच्याकडे तो वाढला.
आई वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्याने आपल्या काका काकी यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासाला सुरुवात केली. त्याचबरोबर इतरांचेही सहकार्य लाभले. याचबरोबर उत्कर्ष शिक्षण आणि सेवा मंडळ या संस्थेकडून त्याला मोलाचे सहकार्य लाभत गेले. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मूतगा येथे घेतले. त्यानंतर पदवी शिक्षणासाठी बेळगाव येथील ज्योती कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला. जिद्दीच्या आणि अभ्यासाच्या जोरावर त्याने कॉमर्स मध्ये 95 टक्के घेऊन कॉलेज मध्ये प्रथम क्रमांक घेऊन तो उत्तीर्ण झाला.
संदीप गिरमल याचे माध्यमिक शिक्षण मुतगा हायस्कूलमध्ये झाले आहे. प्रारंभापासूनच तो एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. संदीप याने जेंव्हा मुतगा हायस्कूलमधील इयत्ता 8 वीमध्ये प्रवेश घेतला तेंव्हापासून शिक्षणप्रेमी नारायण कणबरकर यांनी त्याची शैक्षणिक फी माफ होईल अशी व्यवस्था केली. तसेच मुतगा गावातील उत्कर्ष शिक्षण व सेवा मंडळ ट्रस्टतर्फे त्याला आवश्यक ती सर्व शैक्षणिक मदत मिळवून दिली. दहावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण मिळविणाऱ्या संदीप याला इंजिनीयर होण्यासाठी अभियांत्रिकी शाखेत जायचे होते. तथापि इयत्ता 8 वीपासून संदीप याच्यावर देखरेख ठेवणाऱ्या नारायण कणबरकर यांनी अभियांत्रिकी शिक्षणाचा अवाढव्य खर्च सांगून संदीपला परिस्थितीची जाणीव करून दिली. तेंव्हा संदीपने भविष्यात इंजिनीयर ऐवजी सीए किंवा सीएस होण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःला अभ्यासात झोकून दिले. अतिशयोक्ती वाटेल परंतु संदीप दररोज पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सतत अभ्यास करत असतो.
दहावीनंतर मुतगा येथील नारायण कणबरकर यांनी संदीपला ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन दिला. संदीप गिरीमल याच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी मण्णूर गावातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आर. एम. चौगुले आणि ज्योती कॉलेजचे प्राचार्य व सेक्रेटरी विक्रम पाटील यांनी मोलाचे सहाय्य केले. संदीप गिरीमल याने समर्पण व एकाग्रतेच्या जोरावर आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या बारावी परीक्षेत 600 पैकी 573 गुण संपादन करून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुकासह अभिनंदन होत आहे.