गेल्या 24 तासांत राज्यभरात सलग चौथ्या दिवशी 5 हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवारी दि. 25 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 96,141 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 82 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, नव्याने 163 रूग्ण आढळल्यामुळे बेळगांव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजारावर गेली आहे.
बेळगाव जिल्ह्यात आज शनिवारी नव्याने 163 रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,149 झाली आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह केसेस 1,461 असून आणखी 6 जण मृत्यूमुखी पडल्यामुळे मृतांचा एकूण आकडा 46 झाला आहे. काल सायंकाळपासून आज दिवसभरात हॉस्पिटलमधून 173 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात डिस्चार्ज मिळालेल्यांची एकूण संख्या 642 इतकी झाली आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 25 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज रविवार दि. 26 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 5,199 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 96,141 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 58,417 असून यापैकी 632 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज शनिवारी 2,088 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 35,838 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 82 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 1,878 झाली असून यापैकी 8 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पांच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 1950 रुग्ण – एकूण रुग्ण 45453), बेळ्ळारी (579-4090), म्हैसूर (230-2867), बेंगलोर ग्रामीण (213-1633), मंगळूर (199-4806) आणि बेळगाव (163-2149).
दरम्यान, जगभरात कोरोनाविषाणूचे थैमान सुरू असताना गेल्या 8 मार्च 2020 रोजी बेंगलोर शहरांमध्ये परदेशातून आलेल्या एका व्यक्तीच्या स्वरूपात राज्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर आजतागायत राज्य शासन आणि आरोग्य व कुटुंब कल्याण खाते ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंट आणि टेक्नॉलॉजी या पांच गोष्टींच्या सहाय्याने कोरोनाशी लढा देऊन त्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे राज्याच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.