Thursday, December 19, 2024

/

राज्याने ओलांडला 60 हजार कोविड रुग्णांचा टप्पा

 belgaum

राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली असून कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 19 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणखी 4,120 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 63,772 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 91 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या 1,331 झाली असून ॲक्टिव्ह केसेसची संख्या जवळपास 40 हजार झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यात आज रविवारी नव्याने 87 रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,013 झाली आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह केसेस 583 असून आणखी 2 जण मृत्यूमुखी पडल्यामुळे मृतांचा आकडा 26 झाला आहे. काल सायंकाळपासून आज दिवसभरात हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला नसल्यामुळे जिल्ह्यात डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 404 इतकी स्थीर आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 18 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज रविवार दि. 19 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 4,120 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 63,772 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 39,370 असून यापैकी 579 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज रविवारी 1,290 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 23,065 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 91 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 1,331 झाली असून यापैकी 6 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पांच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 2156 रुग्ण – एकूण रुग्ण 31777), मंगळूर (285-3591), विजयापुरा (171-1585), चिकबळ्ळापूर (135-840), उडपी (134-2223)आणि बेळगाव (87-1013).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.