माजी पत्नीला मारायला गेला आणि कोरोना झाला

0
3
Kakati police station
Kakati police station
 belgaum

पत्नीला घटस्फोट दिला असतानाही तिच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या घटस्फोटित पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर होता. यामुळे पोलिसांनी वीरभद्रनगर येथून त्याला अटक केली होती.

त्याच्या थेट संपर्कात आलेल्या सहा पोलिसांबरोबरच सोळा जणांना कॉरंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. यापूर्वी कॅम्प पोलिसांनी अटक केलेल्या लूटमार प्रकरणातील 29 वर्षीय तरुणाला कोरोणा ची लागण झाली होती .

त्यामुळे संपूर्ण कॅम्प पोलीस स्थानक स्वच्छ करावे लागले होते. आता काकती पोलीस स्थानकाचे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांनी सोळा जणांना कोरं टाईन केले असून पोलिस ठाण्यात सॅनिटायझेशन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

 belgaum

वीरभद्र नगर येथील 38 वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सहा जुलै रोजी त्याला पोलिसांनी अटक केली होती .वीरभद्र नगर येथे राहत असलेल्या त्या व्यक्तीने यापूर्वी घटस्फोट दिलेल्या आपल्या पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.