एकीकडे बेळगावात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सीमेवरील गावातून देखील कोविड पोजिटिव्ह रुग्ण वाढत आहेत.कर्नाटक महाराष्ट्र सीमवरील महाराष्ट्राच्या हद्दीतील पाहिलं गावं असलेल्या शिनोळी इथं कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून रविवारी एकाच दिवसांत या गावात कोरोनाचे 9 पॉजिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत.
रविवारी कोल्हापूर जिल्ह्याचा आरोग्य खात्याच्या अहवाल अनुसार शिनोळी गावातील 9 जणांच्या चाचणीचे अहवाल पॉजीटिव्ह आले आहेत. रविवारी सापडलेल्या रुग्णांत 5 महिला 4 पुरुष आहेत महिलांत एक 19 वर्षीय युवतीचा देखील समावेश आहे.
सुरुवातीला शिनोळी येथे सेवा बजावणाऱ्या एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली होती त्यानंतर त्यांची पत्नी व इतर असे सात जण बाधित झाले होते आजच्या 9 रुग्णांनी मिळून हा आकडा 16 झाला आहे.या गावात समूह संपर्क झाल्याने केवळ शिनोळी नव्हे तर कर्नाटकातील बाची कुद्रेमनी आदी गावातील जनता देखील भयभीत झाली आहे.
शिनोळी मधील वाढता आकडा आजू बाजूच्या गावांना धोक्याचा इशारा आहे त्यामुळे जनतेने सतर्कता बाळगण्याची गरज आहे तर बेळगावकडे येणारी सीमा देखील सील करण्याची गरज निर्माण झाली आहे.