गेल्या 24 तासात राज्यामध्ये आणखी 3,648 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज सोमवार दि. 20 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 71,069 इतकी झाली आहे. आज आणखी 61 जणांचा मृत्यू झाला असून ॲक्टिव्ह केसेसची संख्या 44,140 इतकी झाली आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 20 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज मंगळवार दि. 22 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 3,649 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 71,069 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 44,140 असून यापैकी 583 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज मंगळवारी 1,664 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 25,459 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 61 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 1,464 झाली असून यापैकी 6 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पांच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 1714 रुग्ण – एकूण रुग्ण 34943), बेळ्ळारी (193-2855), मंगळूर (149-3829), म्हैसूर (135-1908), यादगिरी (117-1713) आणि बेळगांव (23-1096).