शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडण्यात आल्यामुळे आज मंगळवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी कर्नाटक उच्च न्यायालयाने वादग्रस्त हालगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाचा स्थगिती आदेश कायम केला आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयात आज मंगळवार दि.29 जुलै रोजी हालगा-मच्छे बायपास खटल्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे झाली. शेतकऱ्यांतर्फे वकील ॲड. रविकुमार गोकाककर यांनी बाजू मांडली.
याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या वकीलांनी बायपास कामावरील स्थगिती आदेश उठवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. तथापि ॲड. गोकाककर यांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडल्याने मा. उच्च न्यायालयाने बायपासची स्थगिती कायम केली आहे.
यामुळे संबंधित सर्व शेतकरी बांधवांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या खटल्याची पुढील सुनावणी ऑगष्ट महिन्यात होण्याची शक्यता आहे.