कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी बुधवारी मुंबई दौऱ्यावर जाणार असून महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत.बुधवार 8 जुलै रोजी मुंबईत उभय राज्यातील दोन्ही मंत्र्याच्या बैठकीत मान्सून पाऊस आणि पूर नियंत्रणावर चर्चा होणार आहे.
बेळगाव आणि उत्तर कर्नाटकात निर्माण होणारी पूर सदृश्य स्थिती यावर कसे नियंत्रण करता येईल यावर दोन्ही मंत्री चर्चा करणार आहेत.
कृष्णा आणि भीमा नदीच्यापुरा बाबत देखील चर्चा होणार असून पूर कसा नियंत्रणात आणता येईल?दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांत कसा समन्वय राहील यावर भर दिला जाणार आहे.
पावसाळ्यात कृष्णा नदीतून किती अतिरिक्त पाणी सोडले जाते याची माहिती देणे, परस्परातील समनव्य व कृष्णा ट्रीबीनल बाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील राज्याचे मुख्य सचिव राकेश सिंह देखील रमेश जारकीहोळी यांच्या सोबत बैठकीत उपस्थित राहणार आहेत.मुंबईत बुधवारी ही बैठक होणार आहे.

आलमट्टी धरणाची उंची वाढवल्या नंतर पाठीमागील सांगली कोल्हापूर इचलकरंजी कराड चिकोडी आदी शहराना पुराचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. प्रतिवर्षी येणाऱ्या पुराने जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होत आहे केवळ कर्नाटक कर्नाटक शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे वरील गावांना कायमस्वरूपी पुराचा धोका निर्माण झाला आहे.कर्नाटकला पाणी हवं आहे त्या बदल्यात पाठीमागील शहराना ते अश्रू देत आहेत याबाबत जयंत पाटील यांनी कठोर भाषेत बोलायची गरज आहे.
रमेश जारकीहोळी हे कर्नाटक राज्यातील एक समन्वयाची भूमिका आहे त्यांनी नेहमीच जनतेचे हित पाहिले आहे हा त्यांचा लौकिक आहे.कर्नाटक प्रशासनात त्यांचा एक दबदबा आहे मानवतावादी भूमिकेतून रमेश जारकीहोळी या पुराच्या दुखण्या बाबत कायमस्वरूपी तोडगा काढतील अशी कर्नाटक व महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे.