बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत आहे.बेळगाव जिल्ह्याची सूत्रे हातात येताच पुन्हा एकदा रमेश जारकीहोळी आक्रमक झाले आहेत.
हिंडलगा येथे झालेल्या कार्यक्रमात सोमवारी रमेश जारकीहोळी यांनी लक्ष्मी यांच्यावर बोचरी टीका करताना कुक्कर माझ्या पैश्यांनी वाटले आहेत असा आरोप केला होता त्याला प्रत्त्युत्तर देताना ग्रामीण आमदारांनी पालक मंत्र्यांचे वक्तव्य बालिश असून आपण न्यायालयात तक्रार करू असे म्हटले होते त्या नंतर बुधवारी रमेश जारकीहोळी यांचे वक्तव्य आहे असून त्यांनी पुन्हा एकदा ग्रामीण आमदारांना टार्गेट केलं आहे.
मागील विधान सभेत कुक्कर कुणाच्या पैश्यांनी वाटले याची शपथ घेऊन सांगा असे आवाहन दिले आहे.बुधवारी बेळगाव विमान तळावर ते बोलत होते.भाजप कार्यकर्त्यांत उत्साह आणण्यासाठी मी वास्तव्य सांगितलं होतं.
माझ्या पैश्यांनी कुक्कर वाटले की नाही ते आपल्या कुल देवतांची हट्टीहोळी वीर भद्रेश्वर शपथ घेऊन सांगावं मी माझी कुल देवता कोल्हापूर महालक्ष्मीची शपथ घ्यायला मी तयार आहेअसे खुल आवाहन देखील त्यांनी दिल आहे.
हेब्बाळकर कसे व्यक्तिमत्व आहे हा बेळगाव जिल्ह्याला माहीत असलेला विषय आहे आमची रणनीती काय आहे ती पुढील निवडणुकीत दाखवून देतो कायदेशीर लढाईला देखील मी सज्ज आहे मात्र पुढील दिवसात नवनवीन विषय तुम्हाला देतो असेही ते म्हणाले.
त्या मागील निवडणुकीत कश्या जिंकल्या आहेत हे सर्वांना माहीत आहे त्यांना राजकारण जमत नाही बुडा सदस्य होण्यासाठी त्यांनी पाय धरले होते हे मी विसरलो नाही असेही त्यांनी नमूद केलं