बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग मधील नगरपालिका कार्यालयातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. यामुळे हे कार्यालय ४८ तासांसाठी सील डाऊन करण्यात आले आहे. हे कार्यालय सील डाऊन करण्यात आल्यानंतरही आजूबाजूच्या परिसरात बिनधास्तपणे व्यवसाय सुरु ठेवण्यात आले होते.
त्याचप्रमाणे येथे वावर करणाऱ्या नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचे गांभीर्य दिसून येत नव्हते. मास्क आणि सामाजिक अंतर राखण्याचे भान येथील नागरिकांमध्ये दिसून येत नव्हते.
याचप्रमाणे कटकोळ पोलीस ठाण्यातील ३ कर्मचाऱ्यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे. या संसर्गित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १७ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच रामदुर्ग केएसआरटीसी युनिटच्या १० कर्मचाऱ्यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे. चालक, निर्वाहक आणि मेकॅनिक यांच्यासह १० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
रामदुर्गमध्ये कोरोना संसर्गाने जोर धरला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. परंतु या परिसरातील नागरिकांमध्ये याबाबतीत गांभीर्याचा अभाव दिसून येत आहे.