कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस लांबणीवर पडलेली राज्यातील पीयूसी द्वितीय वर्षाच्या म्हणजे बारावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी जाहीर झाला आहे. यंदादेखील मुलींनीच या परीक्षेत बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि राज्यात नापास होणार यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून तब्बल 2 लाख 10 हजार 53 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
राज्याचे शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केल्यानंतर पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड उडाल्याचे पहावयास मिळाले. एकाच वेळी हजारो जण निकालासाठी उत्सुक होते. त्यामुळे सर्व्हरवर ताण पडल्यामुळे बऱ्याच जणांना आपला निकाल कळण्यासाठी कांही काळ वाट पाहावी लागली. पदवीपूर्व शिक्षण खात्याने आज मंगळवारी सकाळी बेंगलोर येथे पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केल्यानंतर यावर्षीदेखील मुलींनीच या परीक्षेत बाजी मारल्याचे स्पष्ट झाले. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची पुन्हा एकदा निकालात घसरण झाली आहे.
यंदा राज्यातील 5 लाख 95 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 3 लाख 84 हजार 947 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा लांबल्याचा परिणाम निकालावर झाल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. गेल्या मार्च महिन्यात बारावीची परीक्षा पार पडली होती तथापि लॉक डाऊनमुळे इंग्रजी विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आल्याने परीक्षेचा निकाल लागण्यास अधिक विलंब झाला.
बेळगाव जिल्हा 27 व्या तर चिकोडी शैक्षणिक जिल्हा 20 व्या स्थानी आहे.मागील वर्षीच्या चिकोडी जिल्हा 25 व्या स्थानी होता यावर्षी 20 व्या स्थानी असून बेळगाव जिल्हा मागील वर्षी 28व्या स्थानी होता यावर्षी 27 व्या स्थानी आहे.मागील वर्षी बेळगाव 56.18% निकाल लागत 28 वे स्थान तर यावर्षी59.7% निकाल घेत 27 व्या स्थानी आहे. चिकोडी 60.81 % निकाल घेत 25 व्या स्थानी होता तर यावेळी 63.88% निकाल घेत 20 व्या स्थानी आहे.