महाराष्ट्र राज्य सरकारने ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आगामी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची परवानगी दिली आहे, त्याच प्रमाणे 22 ऑगस्ट रोजीच्या ‘कर्नाटक राज्यातील’ या गणेशोत्सव सणालाही साधेपणाने साजरा करण्यास परवानगी द्यावी त्याचबरोबर या सणात महत्त्वपूर्ण म्हणजे बेळगावात देखील सरकारने सूट द्यावी अशी मागणी गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी हिरेमठ यांच्याकडे लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव याबाबत बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने राज्यातील वेगवेगळे सण साजरा करण्याची परवानगी दिली आहे. मगकर्नाटकात गणेशोत्सवाला का नाही? जसे विविध निर्बंध लावून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी देण्यात आली आहे. त्याच पद्धतीने कर्नाटक शासनाने सुध्दा गणेशोत्सवालाही द्या. 22 ऑगस्ट रोजी हिंदू समाजाचा अतिशय महत्त्वाचा सण असलेल्या गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सूट आणि तशी व्यवस्था सरकारने बेळगावात करुन द्यावी. याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा.असे सांगितले.
सुनिल जाधव यावेळी बोलताना म्हणाले की,हिंदु समाजात गणेशोत्सव या सणाला खूप महत्त्व असते. यादिवशी गणेशोत्सव साजरा करण्याचा अनिवार्य असते. संपूर्ण महाराष्ट्र आणि सीमाभागातील हा सण हिंदु बांधव दरवर्षी मोठ्या हर्षोल्हासात साजरा करतात.
परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्नाटकच्या काही जिल्ह्यातील लॉकडाऊन घोषित केल्याने अनेक सण आणि धार्मिक उत्सव साजरे करता आले नाहीत. असे असतानाही कोविड काळात काही शर्तींच्या आधारावर गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा.परंतु हिंदु समाजाच्या महत्त्वाच्या सणाविषयी सरकारकडून निर्णय झाला आसल्याने बेळगावसह संपूर्ण राज्यातील हिंदु समाज आणि हिंदु संघटनामध्ये खूप अस्वस्थता निर्माण झाली आहे.
यावेळी हेमंत हावळ, विजय जाधव, वकील प्रवीण अगसगी, सुनील जाधव, प्रवीण पाटील, अर्जुन रजपूत, प्रियेष होसुरकर, दिनेश शिरोळकर, योगेश कलघटगी, सुरेंद्र अंनगोळकर,शरद पाटील, गिरीश धोंगडी, रवी कलघटगी गजानन देवरमनी यासह अन्य उपस्थित होते.