कचरावाहू वाहन दुभाजकाला आदळल्याने कचरा वाहन चालकाचा मृत्यू झाला आहे कचरा घेऊन कामास वाहन घेऊन निघाला होता पहाटे साडेतीन च्या सुमारास तो ड्युटीला गेला होता त्यावेळी हा अपघात घडला आहे.
जितेंद्र बापू डावाळे (वय ३४) रा. ज्योतिनगर असे मयताचे नाव आहे. रात्रीच्या अंधारात सीसीबी च्या वाहनाची गांधीनगर येथे दुभाजकाला धडक बसली व तो खाली कोसळला.
त्यातच त्याचा मृत्यू झाला.जिल्हा शवागारात त्याचा मृतदेह हलवण्यात आला आहे. याठिकाणी शहरातील सर्व स्वच्छता कर्मचारी जमले होते. कंत्राट दाराने या अपघाती मयत झालेल्या कचरा चालकाच्या परिवाराला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
बेळगाव उत्तर रहदारी पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.