57 वर्षावरील व्यक्तीला जर कोरोनाची बाधा झाली असेल तर त्यांना होम असोसिएशन मध्ये ठेवण्यात येत आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून बेळगावात पंधरा जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
घरात उपचार सुरु करण्यासाठी सरकारने हालचाली गतिमान केले आहेत. कोरोना बाधितमुळे सिविल हॉस्पिटल व इतर खाजगी दवाखाने देखील हाउसफुल झाले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार कोठे करायचा असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर आता होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सरकारने याचे आदेश दिले आहेत.
बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे अनेक हॉस्पिटल व खासगी दवाखाने देखील सरकारने कोरोना बाधित यांसाठी राखीव ठेवली आहेत. त्यामुळे अनेक जणांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत आता वयोवृद्धांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आता यापुढे 57 वर्षावरील व्यक्तींना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे.
डॉ. परिचारिका नर्स यासह इतरांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत असताना जिल्हा प्रशासनाने होम आयसोलेशन पर्याय निवडला आहे. त्या दृष्टिकोनातून आता बेळगावात पंधरा जणांना होऊन आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.