Wednesday, January 22, 2025

/

गांभीर्य लक्षात न घेता उडविला जात आहे सोशल डिस्टंसिंग नियमाचा बोजवारा

 belgaum

वरील फोटो गुरुवारचा बेळगाव जवळील एका खेडे गावातील आहे जिल्ह्यात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या कार्यक्रमात मात्र सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे.कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना सतर्क होण्याऐवजी नागरिकांकडून मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंग नियमाचा अक्षरशः बोजवारा उडविण्याचे प्रकार घडत असल्यामुळे हा चिंतेचा विषय झाला आहे.

बेळगाव जिल्ह्यासह राज्यात कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने फैलावत असून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. याबरोबरच कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या कांही दिवसांपर्यंत कोरोनामुळे फक्त एका मृताची नोंद असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात लागोपाठ चौघे जण कोरोनाचे शिकार झाले आहेत. ही बाब अतिशय गंभीर असली तरी सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र कोरोनाच्या बाबतीत अक्षम्य निष्काळजीपणा दिसून येत आहे.

Congress
No social distance

नागरिकांकडून बाजारपेठ, भाजी मार्केट दुकाने आदी सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता गर्दी केली जात आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी गावातील नेतेमंडळींच्या कार्यक्रमांना नागरिक दाटीवाटीने गर्दी करताना पहावयास मिळत आहेत. हाच प्रकार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यास येणाऱ्या मंडळींकडून घडत आहे. आपल्या विविध मागण्या जिल्हा प्रशासनासमोर मांडण्यासाठी येणारी ही मंडळी आपल्या मागण्यांची निवेदने देताना अथवा प्रसारमाध्यमांना फोटो देताना दाटीवाटी करत असतात. यावेळी बऱ्याच जणांच्या तोंडावर मास्क तर नसतोच शिवाय ही मंडळी सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचा खुशाल भंग करत असतात. हा प्रकार कम्युनिटी स्प्रेडला अर्थात कोरोनाच्या सामुदायिक फैलावाला निमंत्रण देणारा ठरू शकतो.

कांही दिवसापूर्वी राज्यातील तज्ञांनी कोरोनाच्या बाबतीत आगामी 50 – 60 दिवस निर्णायक ठरणार असल्याचा गंभीर इशारा दिला आहे. या कालावधीत कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासाठी राज्यातील नागरिकांनी अत्यंत काटेकोरपणे कोरोना संदर्भातील खबरदारीचे उपाय आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्य शासन व आरोग्य खात्याने केले आहे. तथापि बेळगाव शहर परिसरातील नागरिकांकडून या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचे दिसून येत आहे. शहर परिसरात सोशल डिस्टंसिंगचा नियम अक्षरशः बोजवारा उडविला जात असल्याबद्दल जागरूक नागरिक तीव्र नापसंती व्यक्त करताना दिसत आहेत. सद्यपरिस्थितीत कोरोना संदर्भातील सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर आदी नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.