Wednesday, December 25, 2024

/

कुठला लॉक डाऊन? यळेबैलमध्ये मटण खरेदीसाठी रिघ

 belgaum

दर रविवारी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला असला तरी ग्रामीण भागात त्याचा फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

आज रविवार आणि त्यात भर म्हणजे आज दीप अमावस्या असल्यामुळे येळेबैल (ता. बेळगाव) गावांमधील मटण दुकानासमोर सकाळी नागरिकांची रीघ लागली होती.

सोशल डिस्टंसिंगच्या नियमाला वाटाण्याच्या अक्षता लावून मटण खरेदीसाठी उत्सुक असलेले हे सर्वजण एकमेकांना खेटून उभी असल्याचे पहावयास मिळाले. सध्या कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता वाढली आहे.

तेंव्हा गावोगावी घडणारा वरीलप्रमाणे कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रकार लक्षात घेऊन ग्रामीण भागातील प्रशासकीय व्यवस्था आणि पोलिसांनी सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.