Friday, November 29, 2024

/

बंदी झुगारून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू!

 belgaum

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी यासंबंधी घोषणा केल्यानंतर यावर आक्षेप घेण्यात येत आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील हे होते.

यावेळी सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर घालण्यात आलेल्या बंदीचा निषेध करण्यात आला. तसेच गणेशोत्सवासंदर्भात महाराष्ट्र सरकारने घालून दिलेल्या नियम व अटींप्रमाणे कर्नाटक सरकारनेही याप्रमाणे नियम अटी घालून गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा सर्व आदेश आणि बंदी झुगारून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

हि बैठक कोनवाळ गल्लीतील सुणगार हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, स्वागताध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस शिवराज पाटील आणि खजिनदार बाबुलाल राजपुरोहित हे उपस्थित होते.

Ganesh maha mandal
Ganesh maha mandal meeting bgm

कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय बहुतांशी गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. परंतु तरीही कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावरच निर्बंध घातले असून हे योग्य नसल्याचे मत उपस्थित कार्यकर्त्यातून व्यक्त करण्यात आले. बेळगावंच्या गणेशोत्सवाची परंपरा आणि स्वरूप येथील लोकप्रतिनिधींना माहित असून त्यांनी याची कल्पना सरकारला द्यावी अशी मागणीही यावेळी उपस्थितातून करण्यात आली. यासंदर्भात लवकरच बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवराज पाटील यांनी केले. या बैठकीत विकास कलघटगी, मदन बामणे, सागर पाटील, गणेश दड्डीकर, बळवंत शिंदोळकर, महादेव पाटील, संतोष कृष्णाचे, शंकर पाटील आदींनी आपले विचार मांडले.

या बैठकीला सतीश गौरगोंडा, राजेंद्र हंडे, सागर उरणकर, हेमंत शिंदे आदींसह अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.