सामान्य माणसाच्या जीवनात श्वासापेक्षाही जास्त वेळा कोरोनाचे नाव घेतले जात आहे. कोरोनाच्या धास्तीने प्रत्येक माणूस भीतीच्या दडपणाखाली जगत आहे. सामान्य सर्दी-खोकल्यामुळेही माणूस धास्तावून गेला आहे. अशातच आपण ज्यांच्यावर विश्वास ठेऊन आरोग्याच्या उपाययोजनांसाठी विश्वास ठेवतो त्याच वैद्यकीय यंत्रणेचा बेदरकारपणा सुरु आहे.
रुग्ण दाखल होण्यापासून ते रुग्णावर उपचार करण्याच्या प्रक्रियेपर्यंत आणि उपचारापासून रुग्णाला रुग्णालयातून मुक्त करण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत बीम्सच्या गलथानपणाचा अनुभव येत आहे. त्यातही आणखी एक भर म्हणजे “मेडिकल वेस्ट”ची !
बीम्सच्या मागील बाजूस फ्लू क्लिनिकच्या परिसरात उघड्यावर मेडिकल वेस्ट टाकण्यात आले आहे. याशिवाय कुरण संक्रमित रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या पीपीई किटचीही योग्य विल्हेवाट लावण्यात आली नसून याच परिसरात हे किट्स उघड्यावर टाकण्यात आले आहेत. यामुळे एका बाजूला आपण सुरक्षितता आणि खबरदारीच्या उपाययोजना राबवित आहोत.
नागरिकांना मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखण्याचे धडे देत आहोत.. यासाठी शासनही करत आहे… परंतु शहाणपण शिकवणाऱ्यांकडूनच बेदरकारपणा वाढत असेल तर कोरोनासारख्या रोगाची धास्ती जनसामान्यांनी घ्यावी कि केवळ दिखाव्यासाठी सुरक्षितता जनसामान्यांनीच पाळावी हा प्रश्न उद्भवत आहे.
हा सारा प्रकार पाहता कोरोना रोगामागे आणि रोगावर नियंत्रण मिळ्वण्यामागे दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा वास येत आहे का? याची कुजबुज मात्र सर्वसामान्य नागरिक करताना दिसत आहेत.