बेळगाव शहरात पोलीस डॉक्टर आणि कासार अश्या लोकांना कोरोनाची बाधा झाल्याने जनतेत धास्ती निर्माण झाली आहे शनिवारी माळी गल्लीत कासार महिला पोजिटिव्ह आढळल्याने बांगडय़ा भरलेल्या महिलांत धास्ती वाढली आहे.
माळी गल्ली येथील व्यवसायाने कासार असलेल्या एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून त्या महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
आरोग्य विभागाने केलेल्या सरसकट स्वॅब तपासणी मोहीमेत माळी गल्ली येथील 58 वषीय महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते. शनिवारी तिचा अहवाल पॉझिटिक्ह आल्याने खळबळ माजली आहे.
तिच्या थेट संपर्कातील कुटुंबियांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. या महिलेकडे येवून बांगडय़ा भरुन घेतलेल्या महिलांनाही धास्ती वाटू लागली आहे.