Saturday, December 21, 2024

/

शिनोळीत दोन महिला पॉजीटिव्ह

 belgaum

बेळगाव जवळीक कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या पहिल्या गावात आणखी दोन महिला पॉजीटिव्ह आढळल्या आहेत.

या गावात सेवा बजावणाऱ्या एका डॉक्टरला कोरोना झाल्या नंतर त्यांच्या प्रायमरी संपर्कात आलेल्या शिनोळी येथील 40 जणांना क्वारंटाइन करण्यात आले होते.त्यातील दोन महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

सरकारी शाळेत क्वारंटाइन असून त्यांच्या घश्याचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले होते त्यापैकी दोघी महिला पोजिटिव्ह आल्या असून त्यापैकी एक 21वर्षीय महिला गरोदर आहे.

दोन्ही पोजिटिव्ह महिलांना चंदगड येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान दोन्ही शिनोळी गावे सील डाऊन करण्यात आली आहेत.

शिनोळी महाराष्ट्र सह कुद्रेमानी,बाची,देवरवाडी, सुरुते, आदी गावातील लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.