कोरोना प्रादुर्भावामुळे बेळगाव जिल्ह्यातील गोकाक, मुडलगी, अथणी, कागवाड आणि निपाणी तालुक्यांमध्ये गेल्या दि. 14 जुलै 2020 रोजी रात्री 8 वाजल्यापासून जारी करण्यात आलेला लॉक डाऊनचा आदेश उद्या बुधवार दि. 22 जुलै 2020 पासून मागे घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जाहीर केले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोकाक, मुडलगी, अथणी, कागवाड आणि निपाणी या तालुक्यांमध्ये आठवड्याभरातसाठी कडक लॉक डाऊन जारी करण्यात आला होता. आता हा लॉक डाऊन मागे घेण्यात येणार असला तरी नागरिकांनी तोंडावरील मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग नियमांचे काटेकोर पालन करावे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांवर देखील चांगल्या पद्धतीने उपचार होतील याकडे लक्ष पुरविले जात असल्याचेही ही जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी स्पष्ट केले आहे.