Monday, December 23, 2024

/

कुसमळी जवळील अपघातात युवक ठार

 belgaum

ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव चोरला रोडवर घडली आहे.

बेळगाव चोर्ला मार्गावरील कुसमळी ता खानापूर गावाजवळ आज सायंकाळी 5:30 च्या सुमाराला हा अपघात झाला आहे. सदर युवक बेळवट्टी ता.बेळगाव येथील असून त्याचे दुचाकी स्वार मित्र जखमी झाले आहेत.

घटना स्थळावरून समजलेल्या अधिक माहिती अनुसार मयत युवकाचे नाव रोहित चांदिलकर असून तो जांबोटी वरून बेळगाव च्या दिशेने आपल्या एका मित्रासोबत दुचाकीवरून येत होता तर अवजड ट्रक बेळगाववरून गोव्याच्या दिशेने जात होती.

कुसमळी येथील एका धोकादायक वळणावर ट्रक चालकाला अंदाज न आल्याने दुचाकी आणि ट्रक यांच्यात अमोरसमोर भीषण धडक झाल्याने त्यात दुचाकी चालक रोहित चांदिलकर याचा जागीच ठार झाला.

तर अन्य दोघे अमर नलवडे, गणेश चौगुले जखमी झाले आहेेत जखमींना उपचारासाठी बेळगाव ला हलविण्यात आले आहे.या प्रकरणी खानापूर पोलिसांत फिर्याद नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.