खानापूर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज सोमवारी खानापूर शहरातील 9 जणांसह तालुक्यातील एकूण 14 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
विद्यानगर खानापूर येथील अनुक्रमे 36, 28, 36 व 17 वर्षे वयाच्या चार पुरुषांसह प्रभूनगर येथील 31 वर्षीय पुरुष, वनखात्यातील 31 वर्षीय पुरुष, खानापूर नगरपालिकेतील 25 वर्षीय पुरुष, मयेकरनगर येथील 36 वर्षीय पुरुष आणि खानापूर बस आगारातील 25 वर्षीय पुरुष असे एकूण 9 जण आज सोमवारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील लोंढा येथील एक 35 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
याखेरीज कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या खानापूर हॉटेल चालकाच्या संपर्कात आलेल्या चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 40 व 30 वर्षीय दोन महिला, एक 43 वर्षीय पुरुष आणि 12 वर्षीय मुलाचा समावेश आहे. एकंदर खानापूर शहराला आता कोरोनाने आपला विळखा घातला असून यामुळे शहरात एक प्रकारची धास्ती निर्माण झाली आहे.