सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे मलाप्रभा नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत आहे. मलाप्रभेला पूर आल्यामुळे असोगा गावानजीकची तटबंदी वाहून गेली आहे.
यंदा मलाप्रभा नदीने दिलेला हा पुराचा पहिला तडाखा असून या पुरामुळे तालुक्यातील तटबंदीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे, कचरा व गाळ जमा झाला आहे. हा कचरा व गाळ त्वरित न हटविल्यास पुराचा धोका अधिक वाढणार आहे. तेंव्हा लघु पाटबंधारे खात्याने याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधित केरकचरा तटबंदीच्या ठिकाणाहून हलवावा, अशी मागणी केली जात आहे.