गोकाकच्या पोटनिवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना गोकाकच्या जेएमएफसी न्यायालयाने सम्सन जारी केले असून १ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
गोकाक पोटनिवडणुकीच्यावेळी प्रचारसभेत वीरशैव लिंगायत समाजाने भाजपलाच मत द्यावे असे वक्तव्य बी. एस. येडियुरप्पा यांनी केले होते. त्यामुळे जातीवाचक विधान केल्याप्रकरणी आचारसंहिता उल्लंघन केल्याचा आरोप ठेऊन गोकाक पोलीस स्थानकात प्रकरण दाखल करण्यात आले होते.
संबंधित प्रकरणासाठी पोलीस ठाण्यातर्फे न्यायालयात “बी” अहवाल सादर करण्यात आला होता. परंतु न्यायालयाने हा अहवाल फेटाळला असून १ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.