Sunday, December 22, 2024

/

उपमुख्यमंत्र्यांच्या गावात हरवली माणुसकी…

 belgaum

बेळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात असणाऱ्या अथणी शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.माणसं एकमेकांशी संशयितांप्रमाणे वागत आहेत. अफवांचे पीक तर अमाप झाले आहे.

माणसं माणुसकी विसरून चालली आहेत. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता आरोप प्रत्यारोप करत आहेत.

या पार्श्वभूमीवर माणुसकीला काळिमा फासणारी व संवेदनशील मनाला चटका देणारी घटना शुक्रवारी अथणीत घडली. सदाशिव हिरट्टी वय 55 या इसमाचे सामान्य आजाराने निधन झाले. लोकांच्यात त्याला कोरोना झाल्याची अफवा पसरवण्यात आली आणि कुणीही अंत्य यात्रेला फिरकलेच नाही. शेवट मृताच्या पत्नीने आणि मुलाने चार चाकी ढकल गाडीवरून मृतदेह नेत अंत्यसंस्कार केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री ज्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात, तिथं साधी शव वाहिका नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे.माणसाचे अंत्य संस्कारही रीतसर होऊ नये अश्या पद्धतीची ही घटना अथणी सारख्या शहरात घडते.चौकातून ढकल गाडी वरून मृतदेह जात असताना लोक बघ्याची भूमिका घेतात.सत्तेच्या साठमारीत गुंतलेल्या नेत्यांना जनतेच्या सामान्य गरजांचीही आठवण नसते काय? अशी भावना लोकांच्यातून व्यक्त होत आहे.

Athani
Athani

माणुसकीला काळिमा फासणारी अशी घटना राज्यात कुठेही घडू नये, यासाठी सत्ताधाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.बिम्स मध्ये वृद्धाचा फरशीवर तळमळत पडत नग्नावस्थेत झालेला मृत्यू,अंत्य संस्कार झाल्या नंतर नातेवाईकांना गफलतीने ‘प्रेत घेऊन जावा ‘ म्हणून आलेला फोन, त्यामुळे नातेवाईकांची झालेली विनाकारण धांदल,सामान्य रुग्णाची कोविड सेंटर मध्ये केलेली व्यवस्था, रुग्णांना देण्यात येणाऱ्या आळ्यायुक्त जेवणाचा निकृष्ट दर्जा,कुत्र्याचे कोविड वार्डात मलमूत्र विसर्जन,संडास बाथरूमची दुर्दशा,अधिकाऱ्यांना झालेल्या कोविडच्या बाधा आणि आता मृतदेहाची झालेली अवहेलना एकंदर स्थिती पहाता राज्य सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यास अयशस्वी ठरलंय अस सिद्ध होत आहे.

आरोग्य मंत्री श्री रामलु यांनी ‘आता फक्त देवावरच विश्वास ठेवा’ असे सांगून राज्य शासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न चिन्ह उभा केलं आहे .आसमानी आणि सुलतानी संकटात जनता भरडली जात आहे हेच सत्य. परिस्थितीचे हे दुर्दैव आहे.

1 COMMENT

  1. Shame on the authorities and so called Social workers who are to be blamed … Feeling very sad..This is not my Belgaum Dist…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.