एका कर्मचाऱ्यांसह हिंडलगा कारागृहात 4 जणांना कोरोना हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात आणखी 14 जणांना कोरोना झाला आहे. यामध्ये एका कर्मचार्याचा ही सहभागी झाल्याने खळबळ माजली आहे. या शिवाय बेळगावात संरक्षण विभागातील कार्यालयात देखील कोरोना चा शिरकाव झाला आहे सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कुल मधील १४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे .
हिंडलगा कारागृहात एकूण सोळा जणांना कोरोना ची बाधा झाली आहे. त्यामुळे कारागृहातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील चौघा जणांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ माजली आहे. शुक्रवारी एका कारागृह कर्मचाऱ्यांचा अहवालही पॉझिटिव आला आहे.
सिविल हॉस्पिटल मधील कोरोना वार्डमध्ये सध्या त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे हाऊसफुल झाल्याने त्यांना हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातच उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे यापुढेही आणखी रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही बाब भीतीदायक असून यापुढे जर रुग्ण वाढले तर त्यांच्यावर कारागृहात उपचार करण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात सोळा जण कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत तर यामध्ये एका कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील प्रशासनाने खबरदारी घेतली असून ज्या कोरोना बाधितांना लागण झाली आहे त्यांना वेगवेगळ्या खोलीमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याचबरोबर कारागृहातील कैद्यां ची संपूर्ण तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.