बेळगाव जिल्ह्यात झपाट्याने वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोनाग्रस्त रुग्णांवर चांगले उपचार केले जावेत आणि त्यांना चांगल्या सुविधा पुरविल्या जाव्यात, अशी मागणी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुप्पा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या चिंतनजनक परिस्थितीकडे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे लक्ष वेधण्यासाठी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी त्यांना पत्र लिहिले आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांना चांगले उपचार आणि सुविधा देण्याबरोबरच बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील कोव्हीड हॉस्पिटलमध्ये परिवर्तन घडवून सुधारणा केल्या जाव्यात. आरोग्य खात्यातील रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणीही जारकीहोळी आणि आपल्या पत्रात केली आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना प्रत्येकी दोन अतिरिक्त ॲम्बुलन्स दिल्या द्याव्यात. याप्रमाणे जिल्ह्यात चिकोडी व गोकाक येथे प्रत्येकी एक अशा आणखी दोन कोरोना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू कराव्यात, असेही आमदार सतीश जारकीहोळी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 936 झाली असून ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा 500 च्या जवळपास पोहोचला आहे. येत्या कांही दिवसात हा आकडा खूप वाढण्याची शक्यता असल्याने केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.