बेंगलोर शहराबरोबरच कर्नाटक राज्यात कोरोना चे संक्रमण वाढले आहे. कोरोना संक्रमणाची धास्ती घेतलेल्या, कर्नाटक सरकारने राज्यात या वर्षीचा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात करता येणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यामुळे बेळगावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना समोर नवा पेच निर्माण झाला आहे.विघ्नहर्त्याच्या उत्सवासमोर सरकारी निर्बंधाचे विघ्न कोरोना संक्रमणाची धास्ती घेतलेल्या, कर्नाटक सरकारने राज्यात या वर्षीचा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात करता येणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यामुळे बेळगावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना समोर नवा पेच निर्माण झाला आहे.मात्र बेळगावचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हावा ही भूमिका शहराच्या गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाने घेतली आहे.
गणेशोत्सव लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव आणि सचिव हेमंत हावळ, सुनिल जाधव, रवी कलघटगी, गजानन देवरमनी, नितीन जाधव यांनी याविषयी आपली भूमिका मांडली असून शासनाचे सर्व प्रकारचे नियमांचे पालन करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी सज्ज आहोत त्यामुळे हा उत्सव रद्द होऊ नये अशी ठाम भूमिका लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने शासनाकडे मांडून हा उसत्व साधेपणाने साजरा करू असा निर्धार व्यक्त केला आहे
यापूर्वी झालेल्या बैठकीत अनेक सार्वजनिक मंडळांनी सरकारच्या आदेशाचे पालन करत, यावर्षीचा उत्सव साधेपणात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.वाढत्या कोरोना संक्रमणाची दखल घेत बेळगाव शहरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीचा उत्सव साधेपणात पार पाडण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.कर्नाटक राज्यात बेळगाव शहरात मोठ्या भव्य दिव्य स्वरुपात गणेशोत्सव साजरा केला जात असतो.बेळगावातील गणेशोत्सव मंडळांनी साधेपणात उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असला तरीही सरकारच्या सार्वजनिक उत्सव आदेशा बाबत मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरलेला दिसत आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर यावर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मार्गसूची बाबत माहिती देणे आवश्यक असल्याचे मत गणेशभक्तांमध्ये व्यक्त केले जात आहे.