कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डची अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत.गुरुवारी रात्री एका कुत्र्याने कोरोना वॉर्डमध्ये प्रवेश करून मलमूत्र विसर्जन केले.नंतर रुग्णांनी सांगूनही कोणीही त्याची दखल घेतली नाही.
त्यामुळे बंदिस्त वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांना त्या दुर्गंधीचा सामना करत रात्र काढावी लागली.कोरोना वॉर्डमध्ये मोकाट कुत्रे प्रवेश कसे करू शकते?असा सवाल तेथे उपचार घेणारे रुग्ण विचारत आहेत.
कोरोना वॉर्डमध्ये तीस रुग्णांना मिळून एक शौचालय आहे.शौचालयात पाणीही नीट येत नाही.त्यामुळे तेथेही दुर्गंधी पसरलेली असते.खिडक्याचे दरवाजे मोडले आहेत त्यामुळे खिडक्यातून पाणी आत येते अशी कोरोना वॉर्डची अवस्था आहे.
आधीच मानसिक दृष्ट्या खचलेल्या रुग्णांना अश्या पद्धतीने दुर्लक्षित व हेळसांड करणारी वागणूक जर दिली तर कोरोना बरोबर मानसिक व्याधींनी देखील रुग्ण त्रस्त होण्याची अभिति वाढली आहे .सामाजिक विषमतेशी झगडणाऱ्या रुग्णाला अश्या प्रकारची वाईट वागणूक दिल्यास त्याचे मानसिक खच्चीकरण होऊन त्याची बरी होण्याची शकयता कमी असते.
कालच दुर्लक्षित झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला त्याच बरोबर अशी जनावर सारखी वागणूक दिली तर माणुसकी हरवलेल्या प्रशासन कडून मानवी हत्या झाल्या सारखेच होईल .