समर्थनगर, विनायक मार्ग येथील श्री एकदंत युवक मंडळातर्फे गलवान खोऱ्यामध्ये भारत व चीन यांच्यातील संघर्षामध्ये शहीद झालेल्या 20 भारतीय जवानांच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रत्येकाच्या नांवे वृक्षारोपण करण्याचा आगळावेगळा कार्यक्रम बुधवारी उत्साहात पार पडला.
गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांनी देशासाठी पत्करलेल्या हौतात्म्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची आठवण म्हणुन श्री एकदंत युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विनायक मार्ग, समर्थ नगर येथे वृक्षरोपण करून शहिद वीर जवानांची नांवे देण्यात आली .
व ते जवान आपल्यामध्ये आहेत याची जाणीव व्हावी यासाठी संबंधित वृक्षांचे उत्तम संवर्धन करण्याची शपथ घेण्यात आली. सुट्टीवर आलेले जवान निलेश गावडे यांच्या हस्ते हा वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री एकदंत युवक मंडळाचे संतोष कणेरी, अरुण गावडे, भरमा पाटील, सुशील कणेरी, दीपक लंगरकांडे व नागेश गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. वृक्षारोपणाप्रसंगी गल्लीतील विजय वर्मा, गिरीश कणेरी, विनायक इंचल, अनंत चौगले, सुधाकर कडोलकर, किशोर कुंडेकर, महादेव पाटील, अभिषेक उचगावकर, सुहास गावडे, मंजुनाथ कणेरी, किरण लंगरकांडे, शुभम उचगावकर, कंग्रालकर, सुरेश पाटील आदींसह बालचमू उपस्थित होता.