समस्या मुळापासूनच उखडून काढायची” हा उद्देशसमोर ठेवून मेक देम स्माईल फाऊंडेशनने बेळगांव शहर परिसरातील 10 कंटेनमेंट झोन्समध्ये कोरोना विरुद्धच्या आपल्या लढ्याला प्रारंभ केला आहे.
मेक देम स्माईल फाऊंडेशनने कोरोना विरुद्धच्या आपल्या लढ्याची सुरुवात उपेक्षीत व्यावसायिकांपासून खास करून नाभिकांपासून सुरू केली आहे. कारण बहुतांश नाभिकांची सुसज्ज दुकाने कोरोनाग्रस्त बनत आहेत. याला कारण नाभिक लोक ग्राहकांच्या अत्यंत निकट संपर्कात येत असतात. आतापर्यंत महागडे सॅनिटायझर आणि अवैज्ञानिक निर्जंतुकीकरणाची पद्धत वापरून नाभिकांनी आपले हात आणि दुकानातील अवजारे व साहित्य स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
तथापी मेक देम स्माईल फाऊंडेशनने आता अमुल बुंद फाऊंडेशनच्या सहकार्याने शहर परिसरातील निवडक नाभिकांना त्यांच्या दुकानांमध्ये विनाशुल्क सॅनिटायझर डिस्पेंसर बसवून देण्याबरोबरच अवजारे स्वच्छ करण्यासाठी विरघळणाऱ्या गोळ्या आणि हँडग्लोज, फेस मास्क सारखे मूलभूत संरक्षणात्मक साहित्य हे सर्व काही विनाशुल्क उपलब्ध करून दिले आहे. मेक देम स्माईल फाऊंडेशन आणि अमुल बुंद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वडगांव, शहापूर, खासबाग, अनगोळ, एपीएमसी रोड, रविवार पेठ, कणबर्गी रोड, यमुनापूर, वैभवनगर आणि वीरभद्रनगर या भागात उपलब्ध निधीतून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. यामुळे या भागातील संबंधित नाभिकांनी समाधान व्यक्त करून मेक देम स्माईल फाऊंडेशन आणि अमुल बुंद फाऊंडेशनला दुवा दिला.
उदरनिर्वाहासाठी एखादा व्यवसायाद्वारे कमाई करणाऱ्यांना या पद्धतीने नवा आशेचा किरण दाखविण्यात आला आहे. कारण सध्याच्या घडीला मूलभूत गरजा भागविण्याइतके उत्पन्न मिळवणे ही काळाची गरज बनली असल्याचे मेक देम स्माईल फाऊंडेशनचे मत आहे.