Sunday, January 12, 2025

/

कफदोष -वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

 belgaum

कफदोष हा अनेक व्यक्तींना कायम सतावणारा विकार आहे. माने साहेब म्हणजे त्यांच्या कंपनीचे सर्वेसर्वा. रोजच फिरतीवर असणार. आज मुंबईत तर उद्या बेंगलोर. रोजच हवामान, आहार, विहार यात बदल. वयाची पन्नाशी उलटल्या वर त्यांना या दगदगीमुळे असेल कदाचित कफाचा त्रास होऊ लागला.

सकाळी उठलं की घसा भरल्यासारखा व्हायचा, ब्रश केल्यावर घट्ट पिवळट असा कफ पडला की बरं वाटायचं. छातीत सतत खसखसल्या सारखं वाटायचं. अधेमधे बारिकसा ताप ही यायचा. डोकं, कान गच्च व्हायचे, डोके दुखायचे. मग सहन होईना झालं की चीडचीड सुरू! सुरवातीला एक्स- रे, टीबीची टेस्ट, अ‍ॅलर्जी टेस्ट सगळं करून झालं. सगळं जेथल्या तेथे. तो कफ मात्र जसाच तेथेल्या तेथेच. अँटीबायोटिक्स, एक्सपेक्टोरंट घेऊनही काही फरक वाटेना. सरतेशेवटी सगळे रिपोर्ट घेऊन आमच्याकडे माने साहेबांची हिस्टरी घेऊन झाली त्यांना घशात प्लॅस्टिकचा थर असल्यासारखे वाटायचे. त्यावरून त्यांना होमिओपॅथिक औषधांचा पहिला डोस दिला.पहिल्या आठवड्यातच 40% फरक दिसून आला. फक्त 3 महिन्यातच कफ छूमंतर.

 

कारणे- वारंवार होणारा घशाचा संसर्ग, यामुळे काय होतं तर घशातील श्लेष्मल आवरणाला अतिरिक्त शेम तयार करण्याची सवयच लागून रहाते. काही विशिष्ट अ‍ॅलर्जी असल्यास त्यामुळेही घशात पातळ द्रवसदृश्य कफ तयार होत रहातो. आजूबाजूच्या वातावरणात सारखे बदल असतील जसं मानेसाहेबांच्या बाबतीत होत असे, तसं तर त्यामुळे शरीराला भोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेताना कष्ट होतात. त्यामुळे कफ, वात, पित्त असे दोष उत्पन्न होतात. आहार जर सात्विक नसेल बाहेरचं खाणं ज्यामध्ये एकच तेल वारंवार तळणासाठी वापरले जाते, किंवा कृत्रिम रंग व खाद्यरसायनं वापरले जातात. तसेच निकृष्ट निसत्व आहारामुळेही शरीरात अनेक दोष उत्पन्न होतात. कित्येकदा तणावामुळे शरीर दबते व शरीरात काही दोष उत्पन्न होतात. त्यामुळे मानसिक तणाव ही अजिबात उपयोगाचा नाही.

Cough file pic
Cough file pic

ज्या व्यक्तींना सारखे बोलावे लागते त्यांना ही कफाचा पुष्कळ त्रास होतो. विशेषता शिक्षक, प्राध्यापक, वक्ते इ. काही लोकांना वार्‍यात काम करावे लागते. कापूस पिंजणारे, खाणीत काम करणारे, रसायन कारखान्यात काम करणारे, सोनारकाम, लोहारकाम करणारे, ऊसाच्या चिपाडाच काम असणारे, धान्य स्वच्छ करणारे अशा व्यक्तींना सूक्ष्म कणांमुळे छातीत दाह होऊन कफाचा त्रास होऊ शकतो. धूम्रपानामुळेही कफदोष उत्पन्न होतो.

लक्षणे- घशात सारखा कफ येणे हे महत्वाचं लक्षण. तो कफ घट्ट किंवा पातळ असतो, घशात रखडल्यासारखे, खवखवल्यासारखं होणे, सतत खाकरावे लागणे, तोंडाला खराब वास येणे, अशीही लक्षणं दिसून येतात. चेहर्‍यावर तेज रहात नाही.
आजार्‍यासारखा चेहरा दिसतो अंगात कणकण रहाते. कित्येकदा जोडीला पित्ताचा त्रास असेल तर घशात कफ व पित्त यांचे मिश्रण तयार होऊन सारखे मळमळते. ऊलटी झाल्यावर बरे वाटते. साधारण खोकलाही येत रहातो.
> उपचार- या विकारावर मात्र होमिओपॅथी शिवाय दुसरा उपाय नाही. समूळ रोगनिवारण फक्त होमिओपॅथी व्दारेच साध्य होऊ शकते. त्यासाठी कालीबाक्रामिकम, कालीकर्ब स्टिक्टा, ड्रासेरा, डलकॅमेरा, रूमेक्स, सिल्पीयम इत्यादी होमिओपॅथीक औषधांच्या उपयोगाने कफदोषाचे निवारण करता येते.

इतर- आपले दैनंदिन जीवन आखीव रेखीव ठेवणे म्हणजे वेळच्यावेळी व्यायाम, आहार, काम, झोप असल्यास शक्यतो कोणत्याही व्याधी त्रास देत नाहीत. सकाळी लवकर उठावे, मुखप्रक्षालन झाल्यावर गरम पाण्यात मीठ व खायचासोडा घालून गुळण्या कराव्यात. नंतर कोमट पाणी प्यावे. माफक व्यायाम करावा. जलनेती हा योगप्रकार येत असल्यास अवश्य करावा. आहारात साखर, मीठ, मैदा, तेल, तूप यांचा अतिरिक्त वापर टाळावा. शिळे खाऊ नये.

डॉ सोनाली सरनोबत
9916106896
9964946918

वारंवार होणारा घशाचा संसर्ग, यामुळे काय होतं तर घशातील श्लेष्मल आवरणाला अतिरिक्त शेम तयार करण्याची सवयच लागून रहाते. काही विशिष्ट अ‍ॅलर्जी असल्यास त्यामुळेही घशात पातळ द्रवसदृश्य कफ तयार होत रहातो.

Posted by Belgaum Live on Saturday, July 18, 2020

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.