Thursday, January 2, 2025

/

अंतिम सत्राची परीक्षा वगळता कॉलेजच्या सर्व परीक्षा रद्द! उच्च शिक्षण मंत्र्यांची घोषणा

 belgaum

कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर पदवी शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता कॉलेजच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री अश्वत्थ नारायण यांनी केली आहे. यामुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा पदवीच्या केवळ अंतिम वर्षाची परीक्षा होणार आहे बाकी सर्व वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून त्यांना नवीन वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचे मंत्री अश्वत नारायण यांनी स्पष्ट केले आहे. तथापि नापास झालेल्या विषय पुढील परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. कमी गुण मिळाले असतील तर ऐच्छिक परीक्षा देण्याची मुभा देखील देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आले आला असल्याचे मंत्री अश्वत्थ नारायण यांनी सांगितले.

राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम परीक्षा होणार असल्यातरी कोरोना संदर्भातील गांभीर्य वाढल्यास बैठक घेऊन याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री अश्वत नारायण यांनी नमूद केले. महाविद्यालयांसाठी डिप्लोमा, बीए, बीकॉम, बीएस्सी व इतर पदवी हे तीन वर्षाच्या कालावधीचे सहा सत्रातील अभ्यासक्रम आहेत. यापैकी फक्त साव्या सेमिस्टरची परीक्षा घेतली जाईल. इंजीनियरिंग सारख्या अभ्यासक्रमाचे आठ सेमिस्टर आहेत तिथे 8 व्या, 10 सेमिस्टर असतील तिथे 10 व्या सेमिस्टरची परीक्षा घेतली जाणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

यूजीसीने अलिकडेच उच्चशिक्षण विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित करण्याच्या मार्गदर्शक सूचनांची रूपरेषा आखली आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन उच्च शिक्षण खात्याने ही मार्गदर्शक तत्त्वे विचारात घेतली आहेत. सर्वच अभ्यासक्रमांचे इंटरमिजिएट सेमिस्टर विद्यार्थी व्यापक मूल्यांकनाच्या निकषावर उत्तीर्ण होतात. अंतर्गत स्कोअर आणि (जिथे लागू असेल तेथे) मागील सत्रातील गुणांच्या 50 :50 सारख्या विस्तृत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण केले जातात, जर विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारण्याची इच्छा असेल तर पुढील सत्रात त्यांची परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थी एखाद्या विषयात नापास झालेले (बॅकलॉग) असल्यास विषय कॅरीफॉरवर्ड केले जातील आणि पुढील सत्रात परीक्षा घेण्यात येईल. बॅकलॉग्ससह अंतिम सेमिस्टर / वर्षाचे विद्यार्थी सप्टेंबर अखेरीस स्क्रिनिंग केले जातील. संबंधित विद्यापीठे लवकरच चांचणी वेळापत्रक आणि इतर माहिती प्रकाशित करतील, असे कळविण्यात आले आहे दरम्यान, कोणाला कांही शंका असल्यास 080 – 22341394 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.