कॅम्प पोलीस स्थानक सील डाऊन झाल्यानंतर केवळ दोनच दिवसात बेळगाव शहरातील आणखी एक शासकीय कार्यालय जनतेसाठी बंद असणार आहे.
सुभाष नगर भागात कोरोना पॉजीटीव्ह रुग्ण आढळल्याने महापालिकेचे मुख्य कार्यालय जनतेसाठी बंद असणार आहे.जनतेच्या तात्काळ कामांकरिता गेट वर कोउंटर सुरू करण्यात येणार आहे.शहर आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.मृतांचा आकडाही वाढत आहे.त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहराच्या मध्यवस्तीत शास्त्रीनगर,माळी गल्ली,खासबाग आणि सुभाष नगरमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यामुळे जनतेची वर्दळ असलेल्या ठिकाणी निर्बंध घालण्यात येत आहेत.
सुभाषनगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याची माहिती शनिवारच्या आरोग्य खात्याच्या बुलेटिनमध्ये आल्यावर सुभाषनगर मधील नागरिक धास्तावलेत.सुभाषनगर मधेच महानगरपालिका कार्यालय आहे.
कामानिमित्त दररोज तेथे शहराच्या कानाकोपऱ्यातून हजारहून अधिक लोक येतात.त्यामुळे खबरदारी म्हणून महानगरपालिकेत देखील नागरिकांना नो एंट्री जाहीर करण्यात आली आहे.अगदी महत्वाचे काम असलेल्यासाठी गेटजवळ काऊंटर उघडून तेथे कामकाज केले जाणार आहे.कोरोनामुळे सरकारी कार्यालये बंद करण्याची शहरात परिस्थिती निर्माण झाली आहे.