जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध प्रशासकीय अधिकाऱयांची प्रगती आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेला भेट देऊन विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलाविली होती.
यावेळी प्रलंबित कामे वेळेवर आणि त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यासोबतच पावसाळ्याला सुरुवात झाली असून प्रलंबित कामे टेंडर प्रक्रियेद्वारे पूर्ण करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.
ईज 90यासंदर्भात जलविकास मंडळ आणि केयूआयडीएफसीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शहरातील पायाभूत आणि विकासकामांविषयी चर्चा करण्यात आली.
पालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी पालिकेतील विविध कामकाजाबद्दल सभेत माहिती दिली. यावेळी पालिका अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्यासहित अनेक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.