एका दिवसात बेळगावात कोरोना रुग्णांनी उच्चांक गाठला असून गेल्या 24 तासात नवीन 64 रुग्ण पोजिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे बेळगाव जिल्ह्याचा आकडा पाचशे पार झाला आहे.
मंगळवारी बेळगावात 64 रुग्ण सापडले असून एकूण आकडा 561 झाला आहे तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 185 वर पोहोचली आहे.आता पर्यंत 362 रुग्ण बरे झाले आहेत.
गेल्या चार महिन्यात एकाच वेळी बेळगाव जिल्ह्यात 64 रुग्ण पोजिटिव्ह मिळाल्याची ही पहिली वेळ आहे इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण पोजिटिव्ह झाल्याने पुन्हा एकदा बेळगावचे आरोग्य खाते हादरले आहे.
मंगळवारी मिळालेले 64 रुग्ण कोणकोणत्या भागातील आहेत लोकल हेल्थ बुलेटिन मध्ये समजणार आहे.सकाळी पासून 50 रुग्ण येणार असल्याची शक्यता होती त्यानुसार आज 64 रुग्ण मिळाले आहेत.