भाजप युवा नेते किरण जाधव यांच्या प्रयत्नांमुळे शहरातील दुरावस्था होत चाललेल्या सब रजिस्ट्रार अर्थात उपनोंदणी कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील उपनोंदणी कार्यालयाचे नूतनीकरण केले जावे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. जनतेच्या या मागणीची पूर्तता व्हावी यासाठी भाजप युवा नेते किरण जाधव गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करत होते.
त्यांच्या या प्रयत्नांना अलीकडेच यश आले असून जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पुढाकाराने बेळगाव नोंदणी कार्यालय इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले आहे.
याबद्दल किरण जाधव यांनी पालकमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे जाधव यांनी काल शनिवारी आपल्या कांही भाजप कार्यकर्त्यांसह उपनोंदणी कार्यालयाला भेट देऊन नूतनीकरणाच्या कामांची पाहणी केली.
तसेच तेथील अधिकाऱ्यांशी इमारतीतील अन्य सुधारणांबाबत चर्चा केली. दरम्यान दुरावस्था झालेल्या उपनोंदणी कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात येत असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.